आजाद समाज पार्टी (कांशीराम) जळगाव जिल्हाध्यक्षपदी सतीश भाऊ गायकवाड यांची निवड.

 


आजाद समाज पार्टी (कांशीराम)  जळगाव जिल्हाध्यक्षपदी सतीश भाऊ गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  3 सप्टेंबर  2025 रोजी  शहरातील पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे आजाद समाज पार्टीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी समाज रक्षक सतीश भाऊ गायकवाड यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सतीश भाऊ गायकवाड हे नेहमी दलित समाज्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात बंड पुकारून  मोर्चे आंदोलन करीत असून शासन दरबारी लढत असतात.  त्यामुळेच त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली असल्याचे. बोलले जातं आहे. नियुक्ती झाल्यानंतर सतीश भाऊ गायकवाड यांच्यावर सर्व समाज बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


या बैठकीत प्रकाश सोनवणे, सचिन सोनवणे, लखन बनसोडे, सचिन सैंदाणे, आबा मोरे, योगेश तायडे, प्राजक्ता तायडे, आदी उपस्थित होते