श्रद्धा आणि सेवेचा संगम : माँ साई हॉस्पिटलची २२ वर्षांची नवरात्री परंपरा

नवरात्रीचा उत्सव म्हणजे भक्तिभाव, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक. शहरातील माँ साई हॉस्पिटलमध्ये मागील २२ वर्षांपासून ही परंपरा भक्तिभावाने जोपासली जात आहे. १९९८ साली हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजीव नारखेडे यांनी देवीची स्थापना सुरू केली आणि आज ती अखंडपणे सुरू आहे.

फक्त उपचार नव्हे तर रुग्णांप्रति असलेली करुणा, कमी खर्चात सेवा देण्याची वृत्ती आणि सामाजिक उपक्रमात नेहमी पुढे असणे ही त्यांची ओळख आहे. साधी राहणी आणि सरळ स्वभावामुळे समाजात त्यांच्याबद्दल आत्मीयतेची भावना आहे.

नवरात्रीच्या काळात हॉस्पिटलमधील देवीचे दर्शन रुग्ण, त्यांच्या कुटुंबीयांना आणि स्थानिक नागरिकांना विशेष श्रद्धा आणि समाधान देते. २२ वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा म्हणजे श्रद्धा आणि सेवेचा अद्वितीय संगम ठरली आहे.