प्रतिनिधी भुसावळ- समाजाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या, आपल्या यजमानांच्या प्रवासात खंबीरपणे साथ देणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी ग्रामगौरव फाउंडेशनने राबविलेल्या आगळ्या-वेगळ्या ‘साक्षलक्ष्मी’ उपक्रमाला सर्वत्र भरभरून दाद मिळत आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती सौ. रजनीताई सावकारे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सलग चार वेळा भुसावळ मतदारसंघातून विजयी होत आज मंत्रीपदाची जबाबदारी निभावत असलेल्या संजय सावकारे यांच्या मागे उभ्या राहून त्यांना पाठबळ देणाऱ्या रजनीताईंचा हा सत्कार केवळ सौभाग्यवतीचा गौरव नाही तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याला वाहिलेला मानाचा मुजरा आहे.
सत्कारावेळी रजनीताई सावकारे म्हणाल्या –
“नवरात्र हा नारीशक्तीचा उत्सव आहे. प्रत्येक स्त्री आपल्या संसारासोबत समाजालाही दिशा देते. या प्रत्येक साक्षलक्ष्मीला हा सन्मान समर्पित आहे.”
ग्रामगौरव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या संकल्पनेतून व कार्याध्यक्षा कु. धनश्री ठाकरे यांच्या नेतृत्वातून नवरात्रोत्सवात राज्यभर हा उपक्रम राबविला जात आहे.
साधेपणात साजरा झालेला मानाचा सत्कार
२४ सप्टेंबर रोजी रजनीताईंच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात साडी-खण, नारळ, सप्तधान्य आणि आकर्षक स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मंत्री संजय सावकारे यांच्या मातोश्री सौ. सुशिलाबाई सावकारे यांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिकच भारदस्त झाला.
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उत्साही उपस्थिती :
अनिता आंबेकर, श्रद्धा चौधरी, वैशाली सेतवाल, सोनल महाजन, वैशाली भगत, राजश्री बादशहा, श्वेता पाटील, वैशाली नारखेडे, ममता अट्रावलकर, वंदना पवार आदींनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
ज्यांनी केला परिपूर्ण कार्यक्रमाचा आराखडा
ग्रामगौरव फाउंडेशनचे उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, सचिव सुभाष मराठे, सहसचिव दस्तगीर खाटीक, कोषाध्यक्षा कु. भाग्यश्री ठाकरे यांच्यासह अरुण इंगळे, संजय निकुंभ, योगेश भोई, प्रकाश पवार, ऑफिस अॅडमिन दीपा बाणाईत, गौरव रणदिवे, योगेश पाटील यांनी समन्वय साधत हा उपक्रम यशस्वी केला.

Social Plugin