जळके जळगाव तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सुपरिचित उन्नत आणि प्रगतीचा चढता आलेख असलेले प्रगतीशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते.असेच येथिल जैन इरिगेशनचे सि.लि.जळगांव चे अधिकृत विक्रेते ,प्रगतिशील शेतकरी आणि सर्व जळगाव जिल्ह्यासाठी सुपरिचित असणारे पि.के अण्णा उर्फ श्री पुरुषोत्तम कौतिक पाटील यांनी सततचा पाऊस व केळी भावातील मंदीची लाट असतांनाही जागतिक दर्जा व उत्तम भाव कायम राखत आज त्यांच्या शेतातील केळी इराण देशाला आय एन आय फार्मर अँग्रो स्टार एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून निर्यात करण्यात आली . त्यांनी शेतात जैन इरिगेशनचे चे G 9 रोपांची लागवड केली ,व डबल ड्रीप सिस्टीम माध्यमातून खतांचा योग्य वापर व कमी खर्चात त्यांनी अतिशय योग्य नियोजनातून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले.
यातुन शेतकर्यांनी खचुन जाऊ नये आणि आपले उत्पन्न आपला भाव हा मिळतोच असे प्रतिपादन श्रीयुत पि.के.अण्णांनी केले.त्यांच्या या शब्दांनी खरेच आपल्या सर्व शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा व वाढणार्या जागतिकीकरणात आपल्या मालाची गुणवत्ता हेच शेती धोरण म्हणून राबविण्यात यावे यासाठी नक्कीच श्रीयुत पि.के.पाटील यांसारखे शेतकरी आपणाला प्रेरणादायी असतात.
या प्रसंगी कंपनी प्रतिनिधी श्री भागेश महाजन, श्री अमोल पाटील,श्री उमेश खडसे तसेच त्यांचे पुतणे श्री संदीप भागवत पाटील,श्री सुभाष भागवत पाटील यांचेसह सर्व सहकारी व तरुण शेतकरी शेतात उपस्थित होते.

Social Plugin