जळगाव – स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी इंडीया वि. पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटींग (सट्टा) खेळविणाऱ्या दोघांवर धडक कारवाई केली असून तब्बल ₹१,०५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी पो.उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजार पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकण्यात आला. यावेळी
प्रकाश हुंदामल सारडा वय ५५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ, रणजीत चत्रभान हंडी वय ३५, रा. गणपतीनगर, जळगाव हे ऑनलाईन सट्टा खेळविताना रंगेहात पकडले गेले.
दोघांकडून रोख रक्कम व ऑनलाईन सट्ट्याचे साहित्य मिळून एकूण ₹१,०५,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४५८/२०२५, महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४, ५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ श्री. संदीप गावीत व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोउपनि शरद बागल, श्रे.पोउपनि. रवि नरवाडे, पोहेको उमाकांत पाटील, पोना विकास सातदिवे, पोकों राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, मपोकों दर्शना पाटील व चा.पोहेको भरत पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव) यांचा समावेश होता.

Social Plugin