मध्य रेल्वेच्या एक्सप्रेसला ‘संविधान एक्सप्रेस’ नाव द्यावे – आझाद समाज पार्टीची मांगणी

 



जळगाव प्रतिनिधी -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला यंदा २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आझाद समाज पार्टीतर्फे मध्य रेल्वेच्या नवीन अथवा विद्यमान कोणत्याही एक्सप्रेस रेल्वेला “संविधान एक्सप्रेस” असे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.


भारत देश संविधानाच्या कलमानुसार चालतो. त्यामुळे या संविधानाचे महत्त्व भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावे आणि लोकांमध्ये जागृती व्हावी, या हेतूने ही मागणी करण्यात आली आहे. विदर्भ एक्सप्रेस, हावडा दुरांतो, गरीब रथ अशा शेकडो गाड्या देशभर धावतात. त्याच धर्तीवर भारताच्या इतिहासातील पहिली “संविधान एक्सप्रेस” सुरू व्हावी, अशी विनंती करण्यात आली.

या संदर्भात आझाद समाज पार्टीतर्फे खासदार स्मिताताई वाघ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, तुषार सोनवणे, प्रकाश सोनवणे, राजू डोंगरे, विजय सुरवाडे, सचिन सरकटे, अभिजीत रंधे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.