बंजारा आरक्षण कृती समिती धुळे जिल्ह्याच्या वतीने उद्या दि.८ ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन अँड सुधीर जाधव यांनी पत्रकार परिषद प्रसंगी केले. पत्रकार परिषदेप्रसंगी प्रा.जवाहर पवार,अनिल पवार, डॉ. साईदास चव्हाण, राहुल जाधव,नवल पवार, कैलास जाधव, दिनेश जाधव, विजय जाधव,योगेश राठोड, डॉ. योगेश जाधव, हर्षल पवार, भास्कर पवार, उपस्थित होते. बंजारा समाजाच्या विराट मोर्चाला श्री अग्रेसन महाराज पुतळा येथून सुरवात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आग्रारोड ,जे. टी . करांचीवाला खुंट, जुनी मनपा, झाशी राणी पुतळा,नवीन मनपा येथून जेल रोड पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. जेल रोड परिसरात होणाऱ्या सभेत समाजबांधवांना प्रा.संदेश चव्हाण, राजेश राठोड , माजी खा .हरिभाऊ राठोड मार्गदर्शन करणार आहेत. हजारोंच्या संख्येने बंजारा समाजबांधव विराट मोर्चात सहभागी होणार आहे. बंजारा समाजाच्या विविध मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षण सी. पी बेरार गॅझेट लागू करणे , लोकूर समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्या.आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चा नंतर समाजाचे शिष्ट मंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ना. फडणवीस यांना निवेदन देणार आहे. शासनाने दखल न घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाज मुंबईला मंत्रालयावर मोर्चा नेणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Social Plugin