खान्देश कुलस्वामिनी श्री.एकवीरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने एकवीरा देवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने सकाळपासून ते सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रात्री जळगाव येथील कलाकार यांच्या जागरणाच्या कार्यक्रम संपन्न झाला. तसेच देवीला ५६ भोग अर्पण करण्यात आले होते. महाआरतीनंतर परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मानकरी पुणे येथील विकास दिंडोरीकर, विश्वास दिंडोरीकर, तसेच गिरधारीलाल बिंदानी , उषा बिंदानी,नितीन बिंदानी, माधुरी बिंदानी, कुणाल बिंदानी,यांच्याहस्ते पालखीचे पूजा करून मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रसंगी एकवीरा देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथ गुरव, नंदलाल गुरव, संजय गुरव, भरत गुरव, मनोहर गुरव,सुनील गुरव, आदीसह भाविक उपस्थित होते.

Social Plugin