जळगाव प्रतिनिधी –
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज दिनांक १४ ऑक्टोबर रोजी शहरातील समता नगर येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे आयोजन राजेश साळुंखे, सचिन सचिन अडकमोल, रोशन महाले आणि रोहित गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
संध्याकाळी ६ वाजता समता नगर येथील नवीन बुद्धविहार येथून या रॅलीला सुरुवात होणार असून, शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली भव्य उत्साहात पार पडेल. रॅलीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक, युवक-युवती व महिला सहभागी होणार आहेत. जय भीम आणि बुद्ध वंदनेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमणार आहे.

Social Plugin