भामर्डी येथील पीडित आशाताई वानखेडे यांना न्याय मिळाला! भीमराज सेनेच्या बेमुदत धरणे आंदोलनाची यशस्वी सांगता

 


धरणगाव तालुक्यातील भामर्डी येथील पीडित आशाताई दशरथ वानखेडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी भीमराज सेनेतर्फे 14 तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.

आज या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली असून, आंबेडकरी समाजाच्या मजबूत ऐक्यामुळे पोलीस प्रशासनाने पीडित कुटुंबाच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे.

पीडित वानखेडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी साथ देणाऱ्या सर्व समाज बांधवांचे कट्टर भीमसैनिक सिद्धार्थ सुरडकर यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

 सामाजिक न्यायासाठीचा हा लढा असाच सुरू राहील असे मत राजूभाई थाटे व सिद्धार्थ सुरडकर यांनी मांडले.