जळगाव: प्रभाग 13 मधून आगामी महापालिका निवडणुकीत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सौ. प्रियंका विनोद तायडे यांना स्थानिक नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी, नागरिक त्यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक चर्चा करत असून त्यांना चांगली पसंती मिळत असल्याचे लक्षात येत आहे.
त्यांचे पती विनोद तायडे हे समाजसेवी असून, त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक तसेच आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. कोरोनाकाळात त्यांनी रुग्णांना मदत केली, महिला उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आणि अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबविले. तसेच, गणेश उत्सव आणि नवरात्र यामध्ये त्यांचा अनमोल सहभाग असतो, ज्यामुळे प्रभागात त्यांचा आदर आणि सन्मान कायम आहे.
त्यांच्या या सामाजिक कार्याचीच पावती म्हणून आता सौ. प्रियंका विनोद तायडे यांना स्थानिकांचा विश्वास आणि पाठिंबा मिळत असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, सौ. प्रियंका तायडे ह्या स्थानिक असून नागरिकांच्या समस्या नीट ओळखतात, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला प्रचंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
प्रभाग 13 मध्ये त्यांची लोकप्रियता, सामाजिक योगदान आणि सांस्कृतिक सहभाग हे आगामी महापालिका निवडणुकीत त्यांचे मुख्य बळ ठरत असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.

Social Plugin