प्रभाग ४ अ मधून सौ. सपना सुरज पवार यांना वाढता नागरिकांचा प्रतिसाद — सुरज पवार यांच्या सेवाभावी कार्याचा मोठा प्रभाव



आगामी महापालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी प्रभाग क्र. ४ अ, जो अनुसूचित जाती – महिला राखीव आहे, या प्रभागात सौ. सपना सुरज पवार या संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे.

सौ सपना सूरज पवार यांच्यावरील नागरिकांचा विश्वास आणि वाढता प्रतिसाद हा त्यांच्या कुटुंबाच्या सेवाभावी कार्याचा प्रतिबिंब मानला जात आहे. त्यांच्या पतींचे—सुरज सुनील पवार—सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदान प्रभागात विशेष उल्लेखनीय आहे. समाजकारण, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम, शैक्षणिक मदत अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कामांची दखल नागरिक घेत आहेत.

गणेशोत्सव, नवरात्र उत्सव यांसारख्या सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनात सुरज पवार यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. कोरोना महामारीच्या कठीण काळात गरजू कुटुंबांना किराणा वाटप, तसेच उन्हाळ्यात नागरिकांसाठी पाण्याच्या टँकरची उपलब्धता करून दिल्याने त्यांची ओळख एक सक्रिय आणि तत्पर समाजसेवक म्हणून निर्माण झाली आहे.

याच सेवाभावी परंपरेचा प्रभाव सौ. सपना सुरज पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवर दिसून येत असून शनिपेठ व गुरूनानक नगर परिसरात नागरिकांकडून त्यांना चांगली पसंती मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.