राष्ट्रवादी (अजित पवार गट) व एमआयएम तालुकाध्यक्षांचा वंचित आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

 





एरंडोल (प्रतिनिधी) –

दि. ३१ ऑक्टोबर रोजी एरंडोल येथे वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्षप्रवेश मेळावा आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे किसान सेल तालुका अध्यक्ष राजेंद्र चौधरी तसेच एमआयएमचे कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.


पक्षप्रवेशानंतर वंचित बहुजन आघाडीचे जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील (लाला सर), जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब हरिश्चंद्र सोनवणे आणि जिल्हा सचिव प्रीतीलाल पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.



 नव्या नियुक्त्या – एरंडोल तालुका


तालुका अध्यक्ष: राजेंद्र चौधरी


तालुका उपाध्यक्ष: दीपक लक्ष्मण पाटील


तालुका उपाध्यक्ष: बबन वेळू वंजारी


तालुका उपाध्यक्ष: अभयसिंग सोनू पवार


अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष: सत्तार खान अकबर खान


अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष: अलाउद्दीन जैनुद्दीन शेख


अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष: शेख कलीम शेख सलीम


तालुका संघटक: मुकुंद भाऊ ठाकूर


कासोदा शहर अध्यक्ष: ज्ञानेश्वर जुलाल पाटील


युवा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष: कामील हमीद मुजावर


युवा अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष: आसन खान शकील खान


पदाधिकारी: शेख नुरा सय्यद, परविन पाटील, विशाल महाजन, दादासाहेब अंबादस लोहार


या कार्यक्रमामुळे एरंडोल तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढली असून, स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.