चोपडा (प्रतिनिधी) – दि. 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भारतीय बौद्ध महासभा (दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया), जळगाव जिल्हा पूर्व शाखा यांच्या वतीने पंचशील नगर, चोपडा येथे आयोजित पाच दिवसीय बौद्ध धम्म बाल संस्कार शिबिराचा आज पाचव्या दिवशी समारोप झाला.
या शिबिरात 9 ते 15 वयोगटातील बाल उपासक व उपासिकांना बौद्ध धम्म, संस्कार, पूजाविधी, आणि सदाचाराचे ज्ञान देण्यात आले. शिबिरातील प्रत्येक दिवशी विविध विषयांवर धम्मदेसना आयोजित करण्यात आल्या होत्या.
आजच्या समारोप सत्रात भन्ते थेरो बोधी (बुद्धगया, बिहार) यांनी बालकांना धम्मदेसना दिली. तसेच भन्ते नागसेन यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे मार्गदर्शन तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य बापूराव गिरधर वाणे, शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ, आणि बौद्धाचार्य वसंत बाबुराव शिंदे यांनी केले.
शिबिरातील बाल सहभागींसाठी फलाहाराचे आयोजन करण्यात आले होते. धम्मदाते अनिता कैलास बाविस्कर (पंचशील नगर) तसेच सुरेखा विकास करनंकाळ, शालिक करंदीकर, आखाडे सर, मेढे सर, आणि जानकीराम सपकाळे यांनी फलाहार प्रायोजित केला.
शिबिराचा समारोप बौद्धाचार्य बापू गिरधर वाणे आणि बौद्धाचार्य वसंत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि समाजबंधूंनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजकांचे अभिनंदन केले.
शिबीर आयोजन
बौद्धाचार्य वसंत बाबुराव शिंदे व समस्त पंचशील नगर समाजबंधू, चोपडा, जि. जळगाव. यांनी केले होते तर शिबीरासाठी
बौद्धाचार्य बापू गिरधर वाणे, बौद्धाचार्य सुदाम अप्पा करनंकाळ, भरत शिरसाठ, आखाडे सर, साळुंखे सर, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, चोपडा. यांचे अनमोल सहकार्य लाभले.


Social Plugin