रामानंद नगर बस स्टॉप येथे ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात संपन्न.

 


रामानंद नगर बस स्टॉप येथे दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण आयोजन उत्साहात पार पडले. नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. देशाच्या प्रगतीसाठी सुरू केलेल्या विविध विकास उपक्रमांची माहिती तसेच पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनपर संदेशाचा लाभ सर्वांनी घेतला

या उपक्रमाचे आयोजन इंजि. गिरीश कैलास भोळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमाला मंडल अध्यक्ष अजित राणे कैलास भोळे, दादा राठोड, प्राची बिऱ्हाडे मॅडम, उषाताई बेहरे, मीनाक्षी चौधरी, शोभाताई बिऱ्हाडे, योगेश मांडे, सुनील पाटील, मयूर भोळे, नागेश लोखंडे, अॅड. दीपक सपके, सौ. नंदिनी गिरीश भोळे, विमलबाई सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी विविध योजनांबाबत आपली मते आणि प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन आणि जनसंपर्क उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी अशा कार्यक्रमांना विशेष महत्त्व असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

मान्यवर व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे ‘मन की बात’ कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.