प्रभाग क्र. ११ मधून इच्छुक उमेदवार इंजि. गिरीश कैलास भोळे यांच्या पुढाकाराने प्रभागात “आजच आपले नाव मतदार यादीत तपासा” हा विशेष जनजागृती कॅम्प भरविण्यात आला. प्रभागातील नागरिकांनी मतदान हक्काची खात्री करून घ्यावी, कोणतेही नाव चुकू नये आणि प्रत्येक मताची नोंद सुरक्षित राहावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या कॅम्पला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अनेकांनी स्वतःचे नाव तपासून घेतले तसेच शेजारी–नातेवाईकांनाही तशी सूचना करण्याचे आवाहन केले.
इंजि. गिरीश भोळे यांना वडील कैलास भोळे यांचा दृढ सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे काका किरण भोळे हे 2004 साली याच प्रभागातून नगरसेवक राहिले असून त्या सेवापरंपरेचा प्रभाव आजही प्रभागात जाणवतो.
मतदार जागृती, प्रत्यक्ष संवाद आणि विकासावरील स्पष्ट दृष्टिकोन यामुळे इंजि. गिरीश भोळे यांच्या अभियानाला प्रभागात वाढता लोकसमर्थन मिळत असून सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Social Plugin