प्रभाग क्रमांक १८ मधील मोहाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भव्य कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. दिनांक १६ डिसेंबर २०२५,मंगळवार रोजी रात्री आठ वाजता ही सभा इच्छुक उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते नितीन आबा गावडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.कडाक्याच्या थंडीतही या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुकाणू समितीच्या सदस्या दीपा नाईक मॅडम, प्रवीण भाऊ खैरनार तसेच आयोजक नितीन आबा गावडे यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करत आपले विचार मांडले .सभेचे अध्यक्षस्थानी माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक कांतीलाल आबा दाळवाले हे होते.
अध्यक्षीय भाषणात कांतीलाल आबा दाळवाले म्हणाले की एवढ्या कडाक्याच्या थंडीतही माता, भगिनी, वयोवृद्ध नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित आहेत.हे सत्ताधारी पक्षाच्या मनमानी कारभाराविरोधातील जनतेचा रोष दर्शविते यावेळी निश्चितच महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर बसेल.असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सत्ताधारी पक्षाने धुळे शहरात चालवलेल्या अनागोंदी आणि विकासविरोधी कारभाराची माहिती त्यांनी नागरिकांना दिली. यावेळी माजी आमदार फारुक शहा यांनीही सभेला संपूर्ण संबोधित करत संपूर्ण शहराचा सर्वसमावेशक विचार करून राबविण्यात आलेल्या विकासकामांचा आराखडा जनतेसमोर मांडला. जात धर्माच्या पलीकडे जाऊन विकासाला मतदान करा असे आव्हान त्यांनी नागरिकांना केले.ज्यांनी मोहाडीचे तीन तुकडे केले, त्यांना सत्तेबाहेर काढून लुकडे करा अशा तीव्र शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत आपले भाषण संपवले.
या कॉर्नर सभेला व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुकाणू समितीच्या सदस्या दीपा नाईक मॅडम , बापुराव पवार,प्रवीण भाऊ खैरनार , देवा भाऊ बागुल , कन्हैया साखरे,कुणाल मरसाळे , यांच्यासह मोहाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेचे आयोजन नितीन आबा गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानत मोहाडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
या सभेमुळे प्रभाग क्रमांक १८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसून आले , आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जात आहे.

Social Plugin