जळगाव | प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत प्रभाग क्र. १२ (क) मधून दीपाली अनुप पानपाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात निवडणूक प्रक्रियेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
दीपाली पानपाटील यांचे पती अनुप पानपाटील हे पत्रकार असून वार्डातील नागरी समस्या, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि स्थानिक प्रश्नांची त्यांना सखोल माहिती आहे. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने कामकाज व पाठपुरावा केला आहे.
विशेषतः आरोग्य क्षेत्रात ते सक्रिय असून गरजू रुग्णांना उपचारासाठी मार्गदर्शन, आवश्यक ते समन्वय तसेच प्रशासनाशी संपर्क साधण्याचे कार्य त्यांनी वेळोवेळी केले आहे. यासोबतच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही अनुप पानपाटील यांनी उपक्रम राबवले आहेत.

Social Plugin