जनतेच्या विश्वासावर इंजि. नितीश कापडणे प्रभाग 12 अ मधून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात.

 


समाजहितासाठी निष्ठेने कार्य करणारे इंजि. नितीश कैलास कापडणे यांनी जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ (अ) – अनुसूचित जागेसाठी आज अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभागात राजकीय चर्चांना वेग आला असून, एक सशक्त व विश्वासार्ह पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

सुशिक्षित, अभ्यासू आणि जनतेशी थेट नाते जपणारे इंजि. कापडणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. वेळेवर मदत, प्रामाणिक कार्यपद्धती आणि अखंड लोकसंपर्क ही त्यांच्या कार्याची ओळख आहे. यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबाबत सकारात्मक भावना झपाट्याने वाढताना दिसत असून, विशेषतः युवक वर्ग आणि कुटुंबप्रमुख यांच्याकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सामाजिक जाणिवेतून त्यांनी अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी मदत केली आहे. मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया व उपचारांची सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. रुग्णांचे उपचार, प्रवास, औषधोपचार तसेच नातेवाईकांची व्यवस्था स्वतः लक्ष घालून पूर्ण केल्यामुळे त्यांच्या कार्याची नागरिकांमध्ये मोठ्या आदराने दखल घेतली जात आहे.

कोरोना महामारीच्या संकटकाळात त्यांनी कोरोना योद्धा म्हणून जीवाची पर्वा न करता अनेक कुटुंबांना आधार दिला. बेड, ऑक्सिजन, रुग्णवाहिका तसेच जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी शेकडो लोकांचे प्राण वाचवले. त्या काळातील त्यांची तत्परता, निर्णयक्षमता आणि सेवाभाव आजही नागरिकांकडून गौरवाने आठवला जातो.

व्यवसायाने अभियंता असलेले इंजि. नितीश कापडणे हे शांत, संयमी आणि प्रगत विचारांचे युवा नेतृत्व असून, कोणत्याही पक्षाच्या बंधनांशिवाय केवळ जनतेच्या विश्वासावर व लोकसेवेच्या बळावर त्यांनी अपक्ष उमेदवारी स्वीकारली आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबद्ध असून, त्यांच्या उमेदवारीकडे नागरिक आशेने पाहत आहेत.