श्री.पंकज सुरेश पाटील यांच्या वाढदिवशी आज रक्तदान; दत्त जयंतीला भव्य कीर्तन

 

जळगाव – प्रभाग क्र. ७ मधून आगामी महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत असलेले श्री. पंकज सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवकॉलनी परिसरात सामाजिक आणि सांस्कृतिक रंगत आणणारे भव्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हॉटेल शिवनेरी ग्रुप व रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेले भव्य रक्तदान शिबीर यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास मोफत हेल्मेट वाटप करून ‘प्राण वाचवा, सुरक्षित राहा’ हा संदेश देण्यात येणार आहे.

रक्तदान शिबीर

मंगळवार, दि. २ डिसेंबर २०२५

वेळ : सायं. ५ ते ८

स्थळ : गुरुकृपा क्लासेस समोर, चांदणी चौक, शिवकॉलनी, जळगाव

“एक पाऊल मदतीचे… प्रयत्न जीव वाचवण्याचे… रक्तदान करून प्राण वाचवूया”

या सामाजिक संदेशाने हे शिबीर विशेष ठरणार आहे.

याच उत्सवी निमित्ताने श्री दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर भारतातील नामवंत किर्तनकार, भागवताचार्य ह.भ.प. श्री. रविकिरण महाराज (दोंडाईचाकर) यांचे भव्य कीर्तन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

 कीर्तन सोहळा

गुरुवार, दि. ४ डिसेंबर २०२५

वेळ : सायं. ८ ते ११

स्थळ : गुरुकृपा क्लासेस समोर, चांदणी चौक, शिवकॉलनी, जळगाव

या दोन्ही कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.---

निवडणूक चर्चेत पंकज पाटील यांचे नाव पुन्हा आघाडीवर

मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती सौ.अंकिता पंकज पाटील यांनी शिवसेनेकडून प्रभाग क्र. ७ मधून निवडणूक लढवली होती व त्यांना २,४५१ मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत श्री. पंकज सुरेश पाटील स्वतः उमेदवारीसाठी सज्ज झाले असून परिसरात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम त्यांच्या कार्यशैलीचे उत्तम उदाहरण ठरत असून नागरिकांत सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे.