जळगावच्या तरुणावर रस्त्यातच हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू यावल पोलिसात खुणाचा गुन्हा दाखल.

 






जळगाव प्रतिनिधी - जुन्या वादातुन केलेल्या मारहाणीत जळगावचच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 2 डिसेंबर रोजी यावल जवळ घडली आहे तुषार चंद्रकात तायडे वय 19 रा. समता नगर जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.  

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव येथील समता नगर येथील तुषार चंद्रकांत तायडे हा 2 डिसेंबर रोजी सकाळी आजीच्या अंत्यविधीसाठी यावल तालुक्यातील वड्डी परसाडे या गावी गेला होता. तिकडून परतत असतांना 6 वाजेच्या सुमारास यावल गावाच्या पुढे असलेल्या पाटाजवळ राहुल सोनवणे, विक्रम पंडित सोनवणे यांच्यासह इतर 6 ते 7 जणांनी त्याला अडवून जबर मारहाण केली या मारहाणीत तुषार हा जखमी झाला. मारेकरी त्याला सोडून तेथून पसार झाले. तुषार हा गंभीर अवस्थेत त्याठिकाणी पडलेला असतांना येथील नागरिकांनी त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे यांच्यासह  6 ते 7 अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तुषार याच्या मारेकऱ्यानां लवकरात लवकर अटक व्हावी अशी परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील तपास यावल पोलीस करत आहे.