इंजी. गिरीश कैलास भोळे—जे प्रभाग 11 मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून ओळखले जातात—यांच्या दीनदर्शिका प्रकाशन जळगाव शहराचे लाडके आमदार राजुमामा भोळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या वेळी आमदार राजुमामा भोळे यांनी प्रभाग 11 मध्ये इंजि.गिरीश कैलास भोळे यांनी सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक उपक्रमांत दिलेल्या योगदानाचे कौतुक करत, त्यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या प्रसंगी दीपकभाऊ सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, कैलास भोळे, केवलसिंग राजपूत, मुकेश महाजन, शैलेंद्र पाटील, हितेश जावळे यांसह स्थानिक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
इंजी. गिरीश भोळे यांनी प्रभाग 11 मध्ये विकासाचे नवे ध्येय ठेवून अधिक सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आणि सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. दैनंदिनी प्रकाशनाचा हा साधा पण उत्साही कार्यक्रम नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करून गेला.

Social Plugin