जळगाव शहरातील सुशिक्षित, अभ्यासू आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारे इंजि. नितीश कैलास कापडणे हे प्रभाग क्र. 12 (अ) अनुसूचित जागेसाठी प्रबळ इच्छुक म्हणून पुढे येत आहेत. त्यांची प्रामाणिक कार्यशैली, थेट लोकसंपर्क, वेळेवर मदत आणि सामाजिक बांधिलकी यामुळे स्थानिकांत त्यांच्या प्रती सकारात्मकता जलद गतीने वाढत आहे. विशेषतः युवक आणि कुटुंबमुख्यांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो असून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल उत्सुकता वाढली आहे.
मंत्री मा. गिरीश महाजन व आमदार राजुमामा भोळे यांच्या सहकार्याने कापडणे यांनी अनेक गरजूंना मुंबईत नेऊन मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या. उपचार, वाहतूक, औषधे आणि नातेवाईकांची सोय यामध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार पाहता लोकांच्या मनात त्यांच्या प्रती कृतज्ञता आणि आदर अधिक दृढ झाला आहे. समाजातील सर्व घटकांसोबत त्यांनी जपलेले मैत्रिपूर्ण संबंध त्यांना मजबूत आधार देतात.
कोरोना काळात त्यांनी कोरोना योद्धा म्हणून अत्यंत जोखीम घेत शेकडो लोकांना मदत केली. बेड, ऑक्सिजन, अँब्युलन्स यांची उपलब्धता करून दिली आणि अनेक कुटुंबांना आवश्यक साहित्य पोहोचवले. त्यांच्या वेगवान निर्णयक्षमतेमुळे त्या कठीण काळात अनेकांचे जीव वाचले. त्यांच्या त्या कार्याची आजही शहरभरात प्रशंसा केली जाते.
पेशाने अभियंता असलेले कापडणे हे शांत, मितभाषी आणि प्रगत विचारांचे युवा व्यक्तिमत्त्व आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती यांसारख्या विकासकामांत ठोस बदल घडवण्याची त्यांची दृष्टी स्पष्ट आहे. शिक्षक असलेल्या आई-वडिलांकडून मिळालेली संस्कारशीलता, शिस्त आणि प्रामाणिकपणा त्यांच्या प्रत्येक कृतीत जाणवतो.
स्वच्छ प्रतिमा, सेवाभाव, शिस्तबद्ध कार्यशैली आणि जनतेसाठी नेहमी उपलब्ध राहण्याची वृत्ती यामुळे इंजि. नितीश कापडणे हे प्रभाग 12 (अ) मधील नागरिकांसाठी एक विश्वासार्ह, सक्षम आणि भविष्याभिमुख पर्याय म्हणून वेगाने उदयास येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाबद्दल आणि कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा वाढतच आहे.

Social Plugin