प्रभाग 10 मधील मतदारांचा कल काँग्रेसकडे; विरोधकांची चिंता वाढली

 




काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आझाद समाज पार्टी तसेच बहुजन मुक्ती पार्टी यांच्या संयुक्त आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून

अनुसूचित जाती (अ) – अनुक्रमांक १ : सतीश मिलिंद गायकवाड

आणि

सर्वसाधारण (ड) – अनुक्रमांक १ : छाया फकीरा अडकमोल

हे निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांच्या उमेदवारीला सर्वसामान्य जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यामुळे दलित, मुस्लिम तसेच सर्व पुरोगामी विचारांच्या मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा वारसा जपणाऱ्या काँग्रेस आघाडीवर नागरिकांचा वाढता विश्वास दिसून येत आहे.

सतीश मिलिंद गायकवाड हे सातत्याने सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणारे, अन्याय-अत्याचाराविरोधात ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. तर छाया फकीरा अडकमोल या महिला सक्षमीकरण, सर्वसामान्यांच्या अडचणी आणि स्थानिक प्रश्नांबाबत नेहमीच सक्रिय राहिल्या आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची जोडी मतदारांमध्ये विश्वासार्ह मानली जात आहे.

प्रचारादरम्यान विविध समाजघटक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अल्पसंख्याक समाजातून या उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, वाढत्या जनसमर्थनामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता आणि धसका निर्माण झाला आहे.

या निवडणुकीत परिवर्तन घडवण्यासाठी, विकास, सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक राजकारणासाठी काँग्रेस आघाडीला मतदान करण्याचा ठाम निर्धार येथील नागरिकांनी केला असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे