जळगाव | प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १२ मध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार वेगाने सुरू असून, संपूर्ण प्रभागात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग १२ (ब) मधून उज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्याने भाजपसाठी हा मोठा सकारात्मक टप्पा मानला जात आहे.
उर्वरित भागांमध्ये भाजपनेही मजबूत उमेदवार मैदानात उतरवले आहेत—
प्रभाग १२ (अ) मधून अनिल सुरेश अडकमोल,
प्रभाग १२ (क) मधून सौ. गायत्री इंद्रजित राणे,
तर प्रभाग १२ (ड) मधून नितीन मनोहर बर्डे (बर्डे आप्पा) हे उमेदवार रिंगणात आहेत.
प्रभागात नागरिकांचे लाडके नगरसेवक म्हणून ओळख असलेल्या नितीन मनोहर बर्डे उर्फ बर्डे आप्पांच्या लोकप्रियतेचा थेट फायदा इतर भाजप उमेदवारांनाही होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या सरळ, साध्या व निर्मळ स्वभावामुळे तसेच नागरिकांशी असलेल्या थेट लोकसंपर्कामुळे अनिल सुरेश अडकमोल आणि सौ. गायत्री इंद्रजित राणे यांनाही नागरिकांची वाढती पसंती मिळत असल्याची जोरदार चर्चा आहे.
एकूणच बर्डे आप्पांच्या नेतृत्वावर असलेला जनविश्वास आणि संघटित प्रचारामुळे प्रभाग क्र. १२ मध्ये भाजपचे पारडे जड होत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.

Social Plugin