जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांत महायुतीने निर्णायक आघाडी घेत सत्तेकडे भक्कम वाटचाल सुरू केली आहे. विविध प्रभागांत महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाल्याने शहरातील राजकीय चित्र स्पष्ट होत आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधील अ, ब, क आणि ड या चारही प्रभागांत महायुतीतील भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.अ प्रभागातून अनिल अडकमोल यांनी विजय संपादन केला,ब प्रभागातून उज्वला बेंडाळे या आधीच बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तर क प्रभागातून गायत्री राणे यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला,तर ड प्रभागातून नितीन बरडे यांनी दणदणीत विजय नोंदवला आहे.
या विजयामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये महायुतीचे वर्चस्व अधिक मजबूत झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी विजयी उमेदवार कटिबद्ध असल्याचे सांगण्यात येत असून, महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने महायुतीची वाटचाल निश्चित होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे

Social Plugin