मेहुणबारे – मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत पोलिसांनी सराईत चोरट्यास अटक करून दोन चोरीच्या मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव मा. श्रीमती कविता नेरकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव उपविभाग मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड सो यांनी मोटरसायकल चोरीसारख्या गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने, दिनांक 08 जानेवारी 2026 रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दरेगाव व वरखेड गावातून दिवसा दोन मोटरसायकल चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 07/2026, बीएनएस कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करून चोरीस गेलेल्या मोटरसायकल हस्तगत करण्यासाठी प्रभारी अधिकारी सपोनि श्री. प्रविण अ. दातरे यांनी अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार केले. पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि परिसरातील हालचालींचा अभ्यास करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
या तपासादरम्यान सदर गुन्ह्यातील तीन आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी दादू संजय सोनवणे (वय 19 वर्षे, रा. दरेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) यास मालेगाव येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली एक मोटरसायकल तसेच इतर एका गुन्ह्यातील अशी एकूण दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तपासात निष्पन्न झाले आहे की, अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत मोटरसायकल चोर असून त्याचे इतर दोन साथीदार सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरु असून त्यांच्याकडून आणखी

Social Plugin