जळगाव | प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० (अ) मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून, श्रीकांत मिलिंद गायकवाड यांना मिळणारा वाढता प्रतिसाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अनुक्रमांक १, निवडणूक चिन्ह – पंजा (काँग्रेस) असलेले श्रीकांत गायकवाड हे काँग्रेस आय, वंचित बहुजन आघाडी, आझाद समाज पार्टी व बहुजन मुक्ती पार्टी यांच्या संयुक्त आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत.
प्रचार फेरी, मतदार भेटी व बैठकींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दलित व मुस्लिम समाजाने यावेळी एकवटून एल्गार पुकारला आहे. सामाजिक न्याय, विकास व सर्वसमावेशक राजकारणाच्या मुद्द्यांवर मतदारांचा कौल गायकवाड यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
या वाढत्या जनसमर्थनामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून त्यांनीही याची गंभीर दखल घेतल्याचे चित्र आहे. प्रभागात बदलाची लाट असून, एकजुटीच्या बळावर श्रीकांत गायकवाड यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्ते व समर्थक व्यक्त करीत आहेत.

Social Plugin