प्रभाग ११ (ब) मध्ये इंजि. गिरीश भोळे यांना जेष्ठ नागरिकांचा आशीर्वाद

 


जळगाव | प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक ११ (ब) मध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचारादरम्यान इंजि. गिरीश कैलास भोळे यांना सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यांची निशाणी रोड रोलर असून विशेषतः जेष्ठ नागरिकांनी ठिकठिकाणी पुढाकार घेत भोळे यांना आशीर्वाद दिले असून अनेक ठिकाणी औक्षण करून प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले. या आपुलकीच्या स्वागतामुळे प्रचाराला अधिकच उत्साहाचे वातावरण प्राप्त झाले आहे.

प्रभागातील विविध भागांत नागरिकांशी थेट संवाद साधताना इंजि. भोळे यांनी विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, तसेच जेष्ठ नागरिक व तरुणांसाठी असणाऱ्या योजनांबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. त्यांच्या प्रामाणिकपणा, शांत स्वभाव आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

“हा उमेदवार केवळ आश्वासन देणारा नसून प्रत्यक्ष काम करणारा आहे,” अशा भावना अनेक जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा आशीर्वाद मिळाल्याने इंजि. भोळे यांचा आत्मविश्वासही अधिक दृढ झाला आहे. अनेक नागरिकांनी उघडपणे निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करत प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला.

एकूणच प्रभाग ११ (ब) मध्ये इंजि. गिरीश कैलास भोळे यांना मिळणारा वाढता प्रतिसाद, जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आणि नागरिकांचा ठाम पाठिंबा पाहता निवडणूक लढत अधिकच रंगतदार होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.