प्रभाग क्र. १२ मध्ये राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) उमेदवाराची प्रचार फेरी


जळगाव प्रतिनिधी

दिनांक ०५/०१/२०२५ रोजी जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार साहेब गट) पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक १२ मध्ये भव्य प्रचार फेरी काढण्यात आली.

ही प्रचार फेरी एम. जे. कॉलेज, ओंकारेश्वर मंदिर, सागर पार्क या परिसरातून काढण्यात आली. या वेळी माजी आमदार संतोष भाऊ चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, महानगराध्यक्ष एजाज अब्दुल गफ्फार मलिक, खोडपे सर, रमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रभागाचे उमेदवार ललितकुमार रामकिशोर घोगले, पवार सुरेश पोपट तसेच असंख्य महिला-पुरुष कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार फेरीदरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.