समाजहिताचा लढवय्या चेहरा – श्रीकांत मिलिंद गायकवाड

 


जळगाव | प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० (अ) मधून अनुक्रमांक १ – निशाणी: पंजा (काँग्रेस)

यावर श्रीकांत मिलिंद गायकवाड हे निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.श्रीकांत मिलिंद गायकवाड हे काँग्रेस (I), वंचित बहुजन आघाडी, आझाद समाज पार्टी व बहुजन मुक्ती पार्टीया संयुक्त आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. दलित, मागास, अल्पसंख्याक व सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची विश्वासार्ह प्रतिमा निर्माण झाली आहे.

 अन्यायाविरोधात सर्वात आधी उभा राहणारा आवाज


आठवडे बाजार परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत झालेल्या प्रकारात सर्वात पहिले घटनास्थळी जाऊन तीव्र विरोध नोंदविण्याचे धाडस श्रीकांत गायकवाड यांनी दाखवले. अन्याय, अवमान व सामाजिक प्रश्नांवर ते नेहमीच आक्रमक भूमिका घेत असल्याने समाजात त्यांना लढवय्या नेतृत्व म्हणून ओळखले जाते.

 सामाजिक कार्याचा ठसा


डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक सामाजिक, प्रबोधनात्मक व युवकांसाठी उपक्रम राबवले आहेत.

 १३ एप्रिल २०२२ रोजी रेल्वे स्थानक परिसरात पहिला डीजे लावून सामाजिक एकतेचा व उत्सवाचा संदेश त्यांनी दिला, जो आजही अनेकांच्या लक्षात आहे.

 समाजहितासाठी सदैव पुढे

श्रीकांत गायकवाड यांचा संपूर्ण प्रवास हा समाजहित, न्याय, समानता आणि संघर्ष यावर आधारित आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी, दलित–वंचितांचे प्रश्न आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच त्यांचे प्रमुख ध्येय आहे.

 त्यामुळेच प्रभाग १० (अ) मधील नागरिकांमध्ये

“लढणारा, बोलणारा आणि काम करणारा उमेदवार”

म्हणून श्रीकांत मिलिंद गायकवाड यांच्याकडे पाहिले जात आहे.