चावरा इंटरनॅशनल स्कूल, तरसोद येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

 


तरसोद येथील चावरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. तसेच देशभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या आकर्षक नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास इंगळे (जळगाव) उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा मिळाली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक फादर अँथोनी, उपमुख्याध्यापक फादर जेरी, सिस्टर सोपी, सिस्टर लिलीत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शिवजयंती निमित्त आयोजित या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, शाळेच्या उपक्रमशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.