जळगाव (प्रतिनिधी) – सुगत तथागत महाविहार, जळगाव येथे उद्या रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० ते १०.०० या वेळेत विशेष धम्मदेशनेचे आयोजन करण्यात आले आहे. संत चोखामेळा वसतिगृह, जळगाव येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या प्रसंगी पूजनीय आर्याजी भिक्खुनी साक्य धम्मदिन्ना (संस्थापक – बोधिपक्खिय धम्म फाउंडेशन, कोषाध्यक्ष – अंतरराष्ट्रीय त्रिपिटक संगायन, बोधगया) या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्या अभिधम्मपिटक विषयाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासिका व शिक्षिका म्हणून परिचित असून, त्यांच्या प्रवचनातून धम्माचे सखोल तत्वज्ञान व आचरणाविषयी मार्गदर्शन मिळणार आहे.
कार्यक्रमात पुज्य. भिक्खुनी उप्पलवर्णा थेरी अय्याजी, पुज्य. भिक्खुनी नागकन्या थेरी अय्याजी, पुज्य. भिक्खुनी सुजाता थेरी अय्याजी, पुज्य. भिक्खुनी धम्मसुमना अय्याजी, पुज्य. श्रामनेरी सुप्रिया अय्याजी व पुज्य. श्रामनेरी अनुत्तरा अय्याजी यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
सर्व उपासक-उपासिका, सुगत तथागत महाविहार, जळगाव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जळगाव शहर व परिसरातील धम्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Social Plugin