बसमध्ये चढताच खिसा साफ! महिलांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात

 



पाचोरा बसस्थानकावर पिकपॉकेट करणाऱ्या तीन महिला जेरबंद; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पाचोरा पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाने बसस्थानक परिसरात पिकपॉकेट करणाऱ्या तीन महिला आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून एकूण ३२,४०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

दि. ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी फिर्यादी श्रावण ताराचंद पाटील (वय ७०, रा. वडगाव खुर्द, ता. पाचोरा) यांचे पाचोरा बसस्थानकावर बसमध्ये चढताना १३,४०० रुपये चोरी झाले होते. याप्रकरणी गुन्हा रजि. क्र. ५११/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल होता.

तपासादरम्यान गुप्त माहितीवरून निर्मला सुनिल जोशी (३३), सोनाली गणेश विधाते (२४) आणि उषाबाई तेजराव ऐकनार (५५) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता आरोपींकडून अनुक्रमे १३,५०० रुपये, ६,६०० रुपये व १२,३०० रुपये जप्त करण्यात आले. पुढील तपास पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी करीत आहेत.