जळगाव जिल्ह्यात भोंगरिया-होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.
ता. चोपडा येथील उनपदेव-वर्डी रस्त्यावर सापळा रचून महेंद्र बोलेरो पिकअप क्रमांक एमपी-४६-झेडबी-८४५४ मधून मध्यप्रदेश निर्मित बिअर व बनावट देशी मद्याची विक्री सुरू असल्याचे उघड झाले.
या कारवाईत ३६६ बिअरच्या बाटल्या, २७३ टॅंगो पंच १८० मि.ली., २६२ टॅंगो पंच ९० मि.ली., २४ रॉयल स्टॅगच्या बाटल्या व वाहनासह एकूण ७ लाख ८१ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अत्तरसिंग मांगिलाल बारेला व विकास विरसिंग बारेला या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्व, विभागीय उप आयुक्त उषा वर्मा व अधीक्षक डॉ. विठ्ठल भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अब्दुल कैय्युम मोमीन यांच्या पथकाने केली.
तपास सुरू असून नागरिकांनी अवैध मद्याबाबत माहिती असल्यास १८००३३९९९९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Social Plugin