महाबळ उतरतीच्या अलीकडे नारायणी अपार्टमेंटजवळ आज २ मार्च रोजी सकाळच्या सुमारास भलंमोठं झाड अचानक कोसळून रस्त्याच्या मधोमध पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र काही काळ वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच भाजपचे उपगटनेते तथा प्रभाग १२ चे नगरसेवक नितीन बरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पालिका प्रशासनाला त्वरित सूचना देत झाड हटवण्याचे आदेश दिले.
पालिका कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत रस्त्याच्या मधोमध पडलेले झाड हटवले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या वेगवान कारवाईबद्दल नागरिकांनी नितीन बरडे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

Social Plugin