जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्ट्यासह अटक केली आहे.
दिनांक 23 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 11 या वेळेत पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 288/2025 मधील फरार आरोपी चेतन सूर्यभान पाटील हा नशिराबाद बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत आहे
माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तत्काळ कारवाई करत सायंकाळी सुमारे 8 वाजून 20 मिनिटांनी आरोपीवर छापा टाकला. या कारवाईत आरोपी चेतन सूर्यभान पाटील, वय 18 वर्षे, रा. वरची आळी, नशिराबाद याला जागीच ताब्यात घेण्यात आले.आरोपीच्या ताब्यातून एक लोखंडी चंदेरी रंगाचा व काळ्या प्लास्टिकच्या मुठीचा गावठी कट्टा तसेच एक डमी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 शस्त्र अधिनियम कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत विरणारे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Social Plugin