संघर्षातून उभं राहिलेलं कुशल नेतृत्व – सतीश भाऊ गायकवाड.

 


कट्टर भीमसैनिक तसेच आझाद समाज पार्टी (कांशीराम) चे जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मुळचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, जुने जळगाव येथील रहिवासी असलेले सतीश भाऊ गायकवाड हे सध्या राजकमल टॉकीज जवळ वास्तव्यास आहेत. समाजकारणात सक्रिय असलेले गायकवाड हे नेहमीच आंदोलनांमध्ये अग्रेसर राहिले आहेत.

कोणतेही आंदोलन असो, ते सर्वात आधी उपस्थित राहून नेतृत्व करत असल्याने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. समाजातील गरजू लोकांसाठी ते सदैव तत्पर असतात. दवाखान्यांमध्ये मदत करणे, सामाजिक उपक्रम राबविणे किंवा कोणत्याही अडचणीत असलेल्या नागरिकांना आधार देणे – अशा विविध कामांमध्ये ते नेहमी पुढे असतात.

त्यांच्या कार्यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार तयार झाला असून समाजात त्यांच्याबद्दल विशेष आदर व्यक्त केला जातो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.