जळगाव : शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक ११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीच्या आधारे प्रभारी अधिकाऱ्यांनी पथक तयार करून तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. यात आरोपी आकाश राजू खरे (रा. नांद्रा, ता. पाचोरा, ह.मु. पिंप्राळा हुडको, जळगाव) व आकाश प्रकाश भिल (रा. कासमपुरा, ता. पाचोरा) यांना अटक करण्यात आली.
न्यायालयाकडून एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर चौकशीदरम्यान आरोपींनी जळगाव शहरातील भज्जी गल्लीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून होंडा कंपनीची ड्रीम मोटारसायकल (क्रमांक MH19 DA 5011) जप्त करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच पोउपनिरीक्षक शांताराम देशमुख, महेश महाजन, महेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, विशाल सांळुके, गोविंद साबळे व जयेश मोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Social Plugin