जिल्ह्यातील राजकारणात मोठी चर्चा निर्माण करणारी मागणी नगरसेवक अनिल अडकमोल यांनी पुढे केली आहे. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीने दलित समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
आजपर्यंत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दलित समाजाला एकदाही संधी मिळालेली नसल्याचे अनिल अडकमोल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या वेळी बदल घडवून आणत स्वच्छ प्रतिमा आणि सशक्त कायदेविषयक अनुभव असलेले ज्येष्ठ विधीतज्ञ राजेशभाऊ झाल्टे यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अडकमोल यांच्या मते, झाल्टे यांना संधी दिल्यास महायुतीकडून आंबेडकरी समाजाला सकारात्मक आणि विश्वासार्ह संदेश जाईल, तसेच सामाजिक समतेचा मजबूत पाया निर्माण होईल.
या संदर्भात जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीष भाऊ महाजन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लवकरच औपचारिक मागणी करण्यात येणार असल्याचेही अडकमोल यांनी सांगितले.
👉 राजकीय समीकरणांमध्ये नवा बदल घडवणारी ही मागणी आता महायुती कशी स्वीकारते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!

Social Plugin