जळगाव : भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. १ मे रोजी समतानगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
समतानगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात नागरिकांना खीरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवन व विचारांवर दीपांकर जाधव यांचे व्याख्यान रात्री ८ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाबाबतची माहिती नगरसेवक अनिल अडकमोल यांनी दिली आहे.

Social Plugin