आयु.कैलास कापडणे यांना मातृशोक


जळगाव शहरातील द्वारकानगरी येथील रहिवासी श्री. कैलास रघुनाथ कापडणे यांच्या मातोश्रींचे दि. २९ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्या श्री. कैलास रघुनाथ कापडणे यांच्या आई असून, इंजिनियर नितीश (सोनू) कैलास कापडणे व श्री. चेतन कैलास कापडणे यांच्या आजी होत.

या दुःखद घटनेमुळे कैलास कापडणे यांना मातृशोक झाला असून, कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नातेवाईक व मित्रपरिवाराकडून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

इंजिनियर नितीश कैलास कापडणे हे सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात अनेकांनी सहभाग नोंदवला आहे.