जळगावात उद्या राजू बागुल यांचा भव्य भीम गीतांचा कार्यक्रम

 


जळगाव : वंचित बहुजन आघाडी, जळगाव यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या भव्य भीम गीतांचा व प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम रविवार दिनांक १० मे २०२६ रोजी सायंकाळी ०६:३० वाजता गाडगे बाबा चौक, १०० फुटी रोड, रायसोनी नगर, महाबळ परिसर, जळगाव येथे होणार आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राजू बागुल हे आपल्या गीतांच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन व मनोरंजन करणार आहेत. तसेच प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, युवा जिल्हा महासचिव डिंगबर सोनवणे, युवा महानगर अध्यक्ष मनोज अडकमोळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.