मुक्ताईनगरात ऑल इंडिया पँथर सेनेचे आक्रमक निवेदन पेट्रोल-डिझेल टंचाई, उपवर्गीकरण आणि फैजपूर हल्ल्याचा निषेध

 


मुक्ताईनगर येथे आज ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षकांना विविध गंभीर विषयांवर आक्रमक निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

या आंदोलनात्मक निवेदनावेळी जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील, उपजिल्हाध्यक्ष अजय शेलार, भुसावळ तालुका प्रमुख समीर गाडे, ॲड. देवेंद्र बोदडे, ॲड. अशोक बोदडे, प्रमोद बोदडे आदी उपस्थित होते.

निवेदनामध्ये तीन प्रमुख विषयांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

पहिल्या मुद्द्यात जळगाव जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईवर तात्काळ उपाययोजना करून सुरळीत इंधन पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांना इंधनाअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

दुसऱ्या मुद्द्यात संविधान व आरक्षण विरोधी उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला.

तसेच फैजपूर येथे एका फोटोग्राफरवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देत सांगितले की, शासनाने या विषयांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास संपूर्ण जिल्हाभर आंदोलन आणि मोर्चे काढण्यात येतील.