भाजप जळगाव महानगरचे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न.

 



जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील बॅक वूड रिसॉर्ट येथे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे आयोजित दोन दिवसीय पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण शिबिर २७ व २८ मे २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.

शिबिराचे उद्घाटन २७ मे रोजी सकाळी १० वाजता श्रीकांत भारती, प्रदीप पेशकार, आ. सुरेश भोळे (राजू मामा), प्रदेश सरचिटणीस भैरवीताई वाघ, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, लक्ष्मण सावजी, महापौर दीपमाला काळे, चंद्रकांत बाविस्कर, रवीजी अनासपुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

या प्रशिक्षण शिबिरात एकूण ११ सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी श्रीकांतजी भारती, लक्ष्मणराव सावजी, प्रदीप पेशकार, रवीजी अनासपुरे व चंद्रकांत बाविस्कर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.


दि. २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आ. सुरेश भोळे, प्रविण आलई, दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, माजी अध्यक्षा उज्वलाताई बेडाळे व माजी महापौर सीमाताई भोळे उपस्थित होते.

यानंतर झालेल्या सत्रांमध्ये प्रविण आलई, माजी आमदार संजय केनेकर व आ. संजय कुटे यांनी मार्गदर्शन केले. समारोप सत्रात खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजप पक्षाच्या वाढीसाठी कठीण काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. केंद्र व राज्यातील सरकार हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली “सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास” या विचारातून काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


दोन दिवसीय निवासी शिबिरात भाजप जिल्हा महानगर पदाधिकारी, आघाडी अध्यक्ष व नगरसेवकांसह सुमारे १५५ कार्यकर्त्यांचा सहभाग होता. प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख दीपक परदेशी होते.

या महाप्रशिक्षण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, मिलिंद चौधरी, प्रकाश पंडित, उदय भालेराव, मयूर भदाणे, संजय नारखेडे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी, जितेंद्र चव्हाण, आनंद सपकाळे, अमित देशपांडे, रोहित सोनवणे, चेतन तिवारी व हर्षल सेतवाल यांनी परिश्रम घेतले.