जळगावच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे काही कार्यकर्ते शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुंबईतील नंदनवन शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
जळगाव शहरातील भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल पाटील तसेच भूषण भोळे यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडीमुळे जळगाव शहरातील भाजपला धक्का बसल्याची चर्चा असून शिंदे गटाचे संघटनात्मक बळ वाढल्याचे मानले जात आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात भूषण भोळे, राहुल पाटील, प्रशांत कोळी, विशाल महाजन, महेश पाटील, मुकेश पाटील, गणेश बच्छाव, प्रशांत चौधरी, राजीक पटेल, ओम बारी, रंजन पाटील, चेतन चौधरी, अक्षय भडांगे, सुयोग गुजर, विकास ठाकरे, जयेश पाटील, सागर पाटील, लोकेश पाटील, भावेश पाटील, दीपक कोळी, तौफिक खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून आगामी स्थानिक राजकारणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Social Plugin