भारत सरकार च्या जाहिरातींवर "मोदी सरकार" म्हणून नामो उल्लेख वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप...




भारत संकल्प विकसित यात्रेत 'मोदी सरकार'चा उल्लेख करण्यात आल्याने अनेक गावांत यात्रांना परतवून लावण्याच्या घटना घडल्या. कुठल्याही शासकीय कामात 'भारत सरकार' ऐवजी 'मोदी सरकार', असा उल्लेख वारंवार करण्यात येत असल्याने आता याबाबतची चीड निर्माण झाली आहे. म्हणून मोदी सरकारच्या या जाहिराती वर वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे.


आज वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ मोदी सरकारचे नाम उल्लेख असलेले बॅनर काढण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या ठिकाणी मोदी सरकार नावाचे बॅनर असतील त्यांच्यावर काळेफासू असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी बोलताना सांगितले की, आम्हाला भारत सरकार पाहिजे आहे. मोदी सरकार नव्हे. वारंवार मोदी सरकार, मोदी सरकार असे सांगून आम्हाला मूर्ख बनविण्याचे काम देशात सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.


तसेच धुळे शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ प्रत्येक घराघराच्या भिंतीवर काढण्यात येत आहे हे पक्षाचे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नाही म्हणून निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागण्याच्या आधीच हे निवडणूक चिन्ह काढण्यात यावे अन्यथा निवडणूक आयोगाच्या नियमा खाली आचारसंहिताचा भंग म्हणून ज्यांच्या घरावर हे पक्ष चिन्ह असेल आणि ज्यांनी हे काढले असेल अशांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.


यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, धुळे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, आबा खैरनार, मयूर अहिरराव, सिताराम वाघ, चंद्रमणी वाघ, फक्रुद्दीन खाटीक, आकाश बागुल, महेंद्र बोरसे, अमोल पवार, मुन्ना सरकार, रहीम पटेल, ईश्वर राजपूत, सागर चव्हाण, रघु खोपे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.