दक्ष पत्रकार संघाच्या वतीने भीमगीतांचा कार्यक्रम, गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप.

 


धुळे - येथील दक्ष पत्रकार संघातर्फे विश्वरत्न , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. भिम गीतातून  महामानवांच्या विचारांचा जागर करीत त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.तसेच गरीब व गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले . शिवतीर्थाजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



कार्यक्रमाच्या सुरुवातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नागसेन बागुल व मान्यवरांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व केक कापून अभिवादन करण्यात आले.

तसेच गरीब व गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.त्यानंतर गायक डॉ. पं. घनश्याम थोरात यांचा भिमगीतांचा कार्यक्रम झाला.

त्यांनी भीमगीतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या विचारांचा जागर केला. यावेळी बाबासाहेबांचे अनुयायी,भीमप्रेमी  मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.बागुल व  पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.