सायबर पोलिसांची कामगिरी दिल्लीतून दोन आरोपींना केली अटक.






जळगाव सायबर पोलीस स्टेशन येथे सी.सी.टी.एन.एस नं. 28/2024 भादवी कलम 420/34  सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 डी प्रमाणे दाखल गुन्ह्यात,  सायबर पोलिसांनी दमदार कामगिरी करत,  सायबर गुन्हा करणाऱ्या दोन आरोपीना दिल्ली येथून अटक करीत गुन्हा उघडकीस आणला आहे. सायबर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस  आणल्याबद्दल जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, पोलीस निरीक्षक निकम, पोलीस नाईक प्रदीप चौधरी वसंत बेलदार, श्रीकांत चव्हाण,  ललित नारखेडे  यांचा आज जिल्हा पोलीस अधीक्षक  महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की 

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,  दिनांक 8-2-2024 ते 8-4-2024 या कालावधीत अज्ञात इसमांनी

राम इन्व्हेस्टमेंट अकॅडमी या नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून,  techstar कंपनी मार्फत शहर मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा  होईल अशी खोटी बतावणी करून, फिर्यादीस techstar एप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून शेअर खरेदी करण्यासाठी संशयितांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पैसे घेत फिर्यादीची 2 लाख रुपयांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.  सायबर पोलिसांनी  दमदार कामगिरी करत, हा गुन्हा करणाऱ्या रणजीत सिंग मदन कुमार वय 43 रा. जहांगीर पूर दिल्ली,  प्रवीण कुमार वीरेंद्र शाही वय 43 अंबरहाय एक्सटेन्शन द्वारका सेक्टर 19 दक्षिण दिल्ली. या  दोन आरोपीना दिल्ली येथून अटक करीत गुन्हा उघडकीस आणल्याने सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, पोलीस निरीक्षक निकम, पोलीस नाईक प्रदीप चौधरी वसंत बेलदार, श्रीकांत चव्हाण,  ललित नारखेडे  यांचा आज जिल्हा पोलीस अधीक्षक  महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.