धुळे शहरातील देवपूर परिसरात भरवल्या जाणाऱ्या बुधवार बाजार लावण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी बुधवार बाजारातील दुकानदारांतर्फे, धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत विनंती करण्यात आली आहे. यावेळी अनेक दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, देवपूर परिसरातील बुधवार बाजार पुन्हा सुरू करण्यात यावा आणि बुधवार बाजार लावण्यासाठी परवानगी देण्यात यावी. या बाजारावर अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह आहे, व त्यामुळे अनेक लोकांना कामधंदा व मजुरी मिळत असते व यावरच बरेचशे गरीब लोकांचे घर चालत होते. बुधवार बाजार बंद झाल्याने अनेक गोरगरीब लोकांचे पोटवर कुऱ्हाड पडली आहे. त्यामुळे सर्व गोरगरीब लोक बेरोजगार झाले असून, त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी वरील नमुद सर्व गोष्टींचा मानवतेच्या दृष्टीने सहानुभूतीपूर्वक विचार करुन तात्काळ बुधवार बाजार सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.


Social Plugin